होम आयसोलेशनमधील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक – पालकमंत्री जयंत पाटील

राजू थोरात तासगाव सांगली प्रतिनिधी
.२३ प्रतिनिधी
होम आयसोलेशनमधील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी नियमांचे पालन करायला हवे. गावा-गावातील रुग्ण संख्या कमी करायची असेल तर रुग्णांनी स्वतः अलगीकरण कक्षात दाखल व्हावे. यातून कोरोनाचा प्रसार थांबेल,असा विश्वास राज्याचे जल संपदा मंत्री,व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी वाळवा व बागणी येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

ना. जयंतराव पाटील यांनी रविवारी आष्टा शहर, बागणी, वाळवा,नवेखेड या गावांना अचानक भेटी देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे व तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी तालुक्यातील गावनिहाय आढावा मांडला.


यावेळी ना.पाटील यांनी आष्टा येथे नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या अलगीकरण कक्षाची पाहणीदेखील करण्यात आली.
उपसभापती नेताजी पाटील, देवराज पाटील, जि. प सदस्य संभाजी कचरे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, वैभव शिंदे, झुंजार पाटील, विराज शिंदे, बाळासाहेब पाटील, रविन्द्र सबनीस, संग्रामसिंह पाटील, माणिक शेळके, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक सिद्ध, वर्धमान मगदूम, अर्जुन माने,एल. बी. माळी, सतीश माळी, विष्णू किरतसिंग, शिवाजी चोरमुले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी – वाळवा,बागणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आढावा घेताना पालकमंत्री जयंतराव पाटील. समवेत अधिकारी,पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *