पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र संघटनेच्या पुणे जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर – आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे जिल्हा कार्याध्यक्षपदी

शिरूर
दि. 22/05/2021

पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र ही एक पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारी संघटना असून, पत्रकारांच्या सर्वच संघटनांशी सलोखा ठेवून कार्यरत आहे.
संघटनेच्या पुणे जिल्हा पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे शिरूर विभागीय संपादक रवींद्र खुडे यांची, संघटनेने पुणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. शिवाय शिरूर तालुका व आंबेगाव तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणूनही, अधिकची जबाबदारी दिली आहे.

याशिवाय पुणे जिल्ह्यातील इतरही पदाधिकाऱ्यांच्या निवडी संघटनेने जाहीर केल्या आहेत.
या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे पाटील यांच्या सहीने या निवडीची पत्र देण्यात आली आहेत.
पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र खुडे यांची निवड झाल्याबद्दल, मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी अभिनंदन करत आपला आवाजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा यानिमित्त रोवण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर आपला आवाजच्या सर्व संपादक, ब्युरो चीफ, रिपोर्टर, एडिटर व स्टाफ कडून खुडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, की जे आपला आवाज न्यूज नेटवर्कशी जोडले गेले आहेत, अशा सर्वांनी व मित्रपरिवाराकडून खुडे यांच्यावर फोनद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे जिल्हा पदाधिकारी पुढीलप्रमाणे –

१) रवींद्र खुडे – पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, तसेच शिरूर व आंबेगाव तालुका अध्यक्ष (प्रभारी)
२) तुकाराम गोडसे – जिल्हा संपर्क व प्रसिद्धी प्रमुख, तसेच इंदापूर व दौंड तालुका अध्यक्ष (प्रभारी)
३) विशाल थोरात – पुणे शहर कार्याध्यक्ष.
४) विशाल दरगुडे – पुणे शहर अध्यक्ष.
५) दिनेश कुऱ्हाडे – खेड तालुका अध्यक्ष, तसेच पिंपरी चिंचवड अध्यक्ष (प्रभारी)
६) रमेश कांबळे – मावळ तालुका अध्यक्ष, तसेच भोर, वेल्हे व मुळशी तालुका अध्यक्ष (प्रभारी)
७) चंद्रकांत चौंडकर – पुरंदर तालुका अध्यक्ष.

  त्याचप्रमाणे आधीच्या केलेल्या निवडी सन २०२१ - २२ मध्ये कायम ठेवण्यात आल्यात. त्या पुढीलप्रमाणे -

१) शिलवंत कांबळे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
२) जगदीश उंद्रे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
३) शिवराम कांबळे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
४) योगेश उंद्रे – हवेली तालुका अध्यक्ष.
५) अशोक आव्हाळे – हवेली तालुका उपाध्यक्ष.
६) प्रशांत तुपे – बारामती तालुका अध्यक्ष.
७) अमोल यादव – बारामती तालुका उपाध्यक्ष.
८) रियाज शेख – लोणावळा शहर अध्यक्ष.
९) चांदभाई बळभट्टी – शिरूर तालुका उपाध्यक्ष.
१०) बाळासाहेब सुतार – इंदापूर तालुका अध्यक्ष.
तसेच संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून, मुंबई हाय कोर्टचे जेष्ठ वकील ऍड संतोष शिंदे हे काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *