स्व. राजीव गांधी यांच्या संगणक क्रांतीचा महामारीत उपयोग…..सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि. २१ मे २०२१
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना भारताच्या संगणक क्रांतीचे जनक म्हणतात. या संगणक क्रांतीचा कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा उपयोग होत आहे. सध्या देशभर लॉकडाऊन असतानाही या संगणकांमुळेच कोट्यावधी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तसेच कोट्यावधी कामगार ‘वर्क फ्रॉम होम’ करुन देशाचे अर्थचक्र चालविण्यास हातभार लावत आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या तीसाव्या स्मृतीदिनानिमित्त प्राधिकरण आकुर्डी येथे आयोजित श्रध्दांजली सभेत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे बोलत होते. यावेळी स्व. खासदार राजीव सातव यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या श्रध्दांजली सभेस महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश अल्पसंख्यांक पदाधिकारी राजेंद्रसिंह वालिया, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशूराम गुंजाळ, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, गौरव चौधरी तसेच चंद्रशेखर जाधव, मकरध्वज यादव, संदेश बोर्डे, हिरामण खवळे, विशाल कसबे, बाबा बनसोडे, वसिम शेख, जिफीन जॉन्सन, शैलेश अनंतराव, कुंदन कसबे, शारदा मुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. राजीव गांधी आणि स्व. राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शुक्रवारी (दि. 21 मे) शहर कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शहरातील विविध झोपडपट्टीमध्ये दहा हजार मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच जिजामाता रुग्णालयात जेवणाचे पॅकेट व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. यावेळी साठे म्हणाले की, आताच्या केंद्र सरकारमध्ये दुरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे अनेक राज्यातील सरकारचा आणि केंद्र सरकारचा समन्वय नाही. अशा वेळी राजीव गांधी यांची उणीव भासते.
स्व. खासदार राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण करताना