पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड कराव्यात. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्वीकृत नगरसेवक संजय मल्हारराव वाबळे यांचे निवेदन.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी- दि २१ मे २०२१
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने त्याच्या स्थापनेपासून मागील ४९ वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांकरिता लीज होल्ड पद्धतीने निवासी प्रयोजनाकरिता भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी इंद्रायणीनगर, निगडी, यमुनानगर, कोयनानगर, वेणूनगर, सिंधूनगर, गंगानगर इ. विविध ठिकाणी ११५०० पेक्षा अधिक सदनिका बांधून त्या नागरिकांना वाटप केले आहेत. आज रोजी ३० वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने त्या इमारतींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. तसेच या इमारती मध्ये वास्तव करणाऱ्या नागरिकांच्या कुटुबांतील सदस्य संख्या वाढल्याने त्यामुळे हि जागा कमी पडत आहे.
तरी या इमारतींचा पुर्नविकास करणे अतिशय गरजेचे आहे. याकरिता पुर्नविकासाबाबतचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. तरी धोरण निश्चित करणेबाबत आपणाकडून संबंधितांना सूचना देण्यात याव्यात असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.