स्थायी समिती सभापती नितीन ज्ञानेशवर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ऑनलाइन झालेल्या बैठकीत 35 कोटी 35 लाख रुपयांच्या शहरासाठी विविध विकास कामांना मंजुरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १९ मे २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लाझ्मा दान करणा-या व्यक्तीस प्रोत्साहनपर रक्कम रुपये २००० प्रति व्यक्ती अदा करण्यास तसेच याकामी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाकडे प्लाझ्मा मागणी करणा-या इतर महानगरपालिका हॉस्पिटल व सरकारी रूग्णालयांमधील रूग्णांसाठी व खाजगी रूग्णालयांमधील रूग्णांसाठी अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी रक्त व रक्तघटक अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी शुल्क न आकारता मोफत देण्यास मान्यता देण्यात आली. यासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे ३५ कोटी ३५ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा

पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळ मळा परिसरामध्ये विविध सोयी सुविधा करणेसाठी स्थापत्य विषयक काम करण्यासाठी ४३ लाख ८५ हजार खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र. ३० मधील दापोडी सुंदरबाग येथे अद्यावत पध्दतीने रस्ता विकसित करण्याकामी २ कोटी ८१ लाख, कासारवाडी शास्त्रीनगर मधील विसावा हॉटेल पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी ३ कोटी ४७ लाख तर शितळादेवी चौक स.नं.६ ते मुस्लीम दफनभूमी स.नं.१५ पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करणेकामी ३ कोटी ४० लाख खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र.६ मध्ये महादेवनगर, सदगुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्याकामी ३० लाख ३५ हजार, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्यासाठी ३० लाख ४२ हजार, तर पुणे नाशिक रस्त्याच्या पश्चिम भागात पावसाळी गटरची सुधारणा करण्याकामी ३१ लाख १२ हजार खर्च होणार आहेत.

जिजामाता रुग्णालयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती आणि कोरोनाच्या अटकावासाठी तातडीचे कामकाजास्तव नवीन इमारतीमधील कॉरीडॉर, अंतर्गत आणि बाहय परिसराची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता करुन घेणेकामी २९ लाख ४७ हजार खर्च केले जाणार आहेत.

ग प्रभागातील स्मशानभूमीमध्ये गॅस/विद्युत वाहिनी बसविणे या कामाकरीता ७६ ë