राजुरी येथे ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटरला सुरक्षा कीट भेट..

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
18/5/2021

राजुरी येथे ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटरला सुरक्षा कीट भेट

विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

राजुरी (ता.जुन्नर) येथील मुस्लिम समाजाने सुरु केलेल्या ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटरला नारायणगाव येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ख्वाजा गरीब नवाज फौंडेशन यांच्या वतीने फौंडेशनचे मार्गदर्शक हाजी नुरमोहम्मद मणियार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कोविड सेंटर मधील डॉक्टर्स,परिचारक,व सेवकांसाठी आरोग्य सुरक्षा कीट प्रदान करण्यात आले अशी माहिती कोविड सेंटर चे प्रमुख नियंत्रक हाजी गुलाम नबी शेख व मुबारक तांबोळी यांनी दिली.
कोविड सेंटर साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुरक्षा कीट मध्ये पी.पी.इ कीट,ऍप्रन,हॅन्डग्लोज, सेनिटीझर कॅन,थर्मल गन, ऑक्सिमीटर इ.आवश्यक वस्तूंचा समावेश असल्याचे हाजी गुलाम नबी शेख यांनी सांगितले.
लोकसहभागातून सुरु असलेले हे कोविड सेंटर सर्व धर्मीय गरजू रुग्णांसाठी खुले असून परिसरातील नागरिकांनी कोविड ची सौम्य लक्षणें दिसताच तपासणी करून विना विलंब रुग्णास ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटर मध्ये विलगीकरनास दाखल करावे असेही आवाहन हाजी गुलाम नबी शेख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ख्वाजा गरीब नवाज फौंडेशनचे मार्गदर्शक हाजी नुरमोहम्मद मणियार,मेहबूब काझी, अध्यक्ष जुबेर आतार, उपाध्यक्ष रज्जाक काझी, जाकीर मणियार,संकल्प संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल,जिलानी पटेल,
अबूभाई पठाण,नजीर शेख,सत्तार मुजावर सोहेल शेख, मुबीन पटेल इ.मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार मुबारक तांबोळी यांनी केले.