पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत कल्लू इनामदार यांनी केली स्वखर्चाने सॅनिटायझर फवारणी..

दि. १७ घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी


देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस बांधव हे दिवस -रात्र आपले कर्तव्य बाजावत आहे. याच पाश्वभुमीवर महाराष्ट्र क्राईम न्युज तर्फे पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत ” एक चांगले काम पोलिसांसाठी “हे उपक्रम राबवित, पोलीस अधीक्षक कार्यालय (पुणे ग्रामीण )अंतर्गत खेड पोलीस स्टेशन, मंचर पोलीस स्टेशन,  नारायणगाव पोलीस स्टेशन,आळेफाटा पोलीस स्टेशन, जुन्नर पोलीस स्टेशन व पोलीस उपविभागीय कार्यालय, जुन्नर व सर्व पोलीस स्टेशन नंतर आज घोडेगाव पोलीस स्टेशन परिसरात देखिल कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व पोलिसांची सुरक्षितता म्हणून सैनेटाईझ करण्यात आले.    

      महाराष्ट्र क्राईम न्युजचे मुख्य संपादक. मा.एकनाथ अडसूळ यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा प्रतिनिधी नजर अली ऊर्फ कल्लू इनामदार, मंचर यांनी सर्व पोलीस स्टेशन सैनेटाईझ करून घेतले त्यात त्याचा मुलगा हैदर अली सय्यद यांनी विशेष सहकार्य घेत फवारणी केली.