आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
17/5/2021
शिंदेवाडी,नळवणे गावाला चक्रीवादळाचा तडाखा,शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान
विभागीय संपादक रामदास सांगळे
सोमवार (दि.१७) रोजी चक्रीवादळाने शिंदेवाडी व नळवणे (ता.जुन्नर) या गावांतील शेतकऱ्यांच्या आंब्याचे व टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
शिंदेवाडीतील सिताराम लक्ष्मण शिंदे व
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आंब्याच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास चक्रीवादळाने हिसकावून घेतला आहे.आंब्याच्या मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडल्या असून बऱ्याच आंब्याच्या फांद्या सुद्धा मोडलेल्या आहेत.तसेच इसुफ शेख, तुकाराम शिंदे, भाऊसाहेब शिंदे, संतोष शिंदे या
शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटोच्या फांद्या मोडल्या असून फुल गळती झाली असल्याची माहिती माजी सरपंच रोहिदास शिंदे यांनी दिली.
नळवणे (ता.जुन्नर) भागातही मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आंब्याच्या कैऱ्या पडल्या असून प्रचंड नुकसान झाला आहे.बाळासाहेब गगे यांची आंब्याची बाग संपूर्ण उदवस्त झाली असून लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिंदेवाडी चे माजी सरपंच रोहिदास शिंदे तसेच प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गगे यांनी केली आहे.