मागील काही दिवसांपासून मंचर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंचर गाव हे अलर्ट म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मंचर ग्रामपंचायतीने काही बंधनकारक निर्णय घेतले असल्याची माहिती मंचर गावच्या सरपंच श्रीमती. किरण राजगुरू उपसरपंच श्री.युवराज बाणखेले यांनी पत्रकार परिषदेत दिली . सदर नियमांनुसार ..
* मंचर गावचे ग्रामस्थ सोडून इतर गावच्या ग्रामस्थांना/रहिवाशांना जर मंचर शहरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना RTPCR टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
* RTPCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच संबंधितांना मंचर गावात प्रवेश देण्यात येईल.
* RTPCR टेस्ट न करता मंचर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल. या क्वॉरंटाईन चा संपूर्ण खर्च सदर नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे. त्याचबरोबर आशा नागरिकांच्या हातावर क्वॉरंटाईन शिक्के मारण्यात येणार आहेत….
तरी मंचर शहरात येताना इतर भागातील नागरिकांनी वरील बाबींचा विचार करावा असे आवाहन मंचर गावचे उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले
यावेळी झालेल्या बैठकीला सरपंच श्रीमती. किरण राजगुरू, उपसरपंच श्री. युवराज बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य श्री. कैलास गांजाळे, श्री. सतीश बाणखेले, श्री. अरुण बाणखेले, वंदना बाणखेले,सौ. ज्योती निघोट व ग्रामविकास अधिकारी के. डी.भोजणे उपस्थित होते.