कोंबरवाडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला,शेतकरी जखमी…ऊसाला पाणी देताना बिबट्याने केला हल्ला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
ब्रेकिंग न्युज

दि.11/05/2020

कोंबरवाडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला,शेतकरी जखमी

विभागीय संपादक रामदास सांगळे

कोंबरवाडी (ता.जुन्नर) येथील कुंजीरमळ्यातील गोविंद कुंजीर (वय-५२) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.
मंगळवार (दि.११) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेताला पाणी देत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंजीर यांच्यावर हल्ला केला.पाणी वळवण्यासाठी कुंजीर खाली वाकले असता बिबट्याने पाठीमागून झडप घातली.बिबटयाच्या पंज्याने अंगातील शर्ट फाटले. कुंजीर सावध मागे वाळल्याने बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यात त्यांच्या हाताला बिबट्याच्या पंज्या लागला.आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली व पुढील अनर्थ टळला कुंजीर यांना पुढील उपचारासाठी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *