वाढदिवसाच्या दिवशी वकिलाने केले प्लाझ्मा दान…जुन्नर तालुक्यातील २ रुग्णांना जीवदान

आळेफाटा दि.०९/०५/२०२१

विभागीय संपादक रामदास सांगळे

वाढदिवसाच्या दिवशी वकिलाने केले प्लाझ्मा दान

जुन्नर वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड सुधीर कोकाटे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील २ रुग्णांना जीवदान दिले आहे.वकिलाच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सध्या जुन्नर न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे प्रसिद्ध वकील सुधीर कोकाटे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. वाढदिवस साजरा न करता त्यांनी सध्या असलेल्या कोव्हीडच्या परिस्थितीत रूग्णांना मदत करण्यासाठी पुणे येथील पुणा स्क्राॅलाॅजीकल इन्स्टिट्यूट ब्लड बॅकेत जाऊन प्लाझ्मा दान केले.

तालुक्यातील अशा प्रकारे तालुक्यातील २ रुग्णांना जीवदान दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत असलेले त्यांचे मित्र सागर भटकळ व संदीप येंधे यांनीही प्लाझ्मा दान करुन या सामाजिक उपक्रमास हातभार लावला त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ॲड सुधीर कोकाटे हे वकीली व्यवसाय करत असले तरी ते सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या वाढदिवसाला काहीना काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात मागील वर्षी पण कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना त्यांनी काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली होती. त्यावेळीही त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.