बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर.
कोरोनामुळे मदत आटली, वृद्धाश्रम संकटात या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. हि बातमी शिरूर तालुक्यातील कान्हेरसर येथील द्वारका वृद्धाश्रमा संदर्भात होती. सविस्तर माहिती घेतल्यावर, असे समजले की, हा आश्रम धार चे राजे पवार बंधू म्हणजेच दिनकरराव पवार यांनी स्थापन केल्याचे व त्याच्या अध्यक्ष सौ कल्याणीताई पवार आहेत असे समजले.
त्यामुळे येथे, श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने काही मदत करण्याचे ठरवले व अशी मदत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
संघटनेच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने रु. ५००० मदत केली.
तर संघेटनेचे समनव्यक व शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक विठ्ठल पवार, यांनी या आश्रमाला तीन महिने पुरेल इतके धान्य व किराणा दिला. तर वाल्हे गावचे सुपुत्र संकेत पवार यांनी रु. २१,००० तर परेल मुंबई येथील श्री योगेश दादा यांनी रु १००० ची मदत केली.
आज हि सगळी मदत आपले धार पवार बंधु असणारे कर्तव्य म्हणून कण्हेरसर येथे जाऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर पवार यांच्या हस्ते देण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष श्री रितेश पवार, समन्वयक श्री सतीश उर्फ बाबा पवार व शिरूर नगर परिषदचे आरोग्य सभापती व संघटनेचे समनव्यक श्री विठ्ठल पवार उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नगरसेवक विठ्ठल पवार यांनीही आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च वाचवून, फ्रंट लाईन वर्कर्स म्हणजेच, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस, होमेगार्डस व पत्रकार आदींना मास्क, सॅनिटायझर, खजूर, पपई वाटून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे लक्षवेधी काम केल्याने, शिरूर मध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
शब्दांकन –
सागर पवार
संस्थापक, अध्यक्ष
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र.