वयोगट 18 ते 45 लसीकरण यमुनानगर स्केटिंग रिंगमध्ये चालू करा- प्रा उत्तम केंदळे नगरसेवक व क्रीडा सभापती
यमुनानगर लसीकरण केंद्रात 18 ते 45 वयोगटासाठी लस उपलब्ध करावी- उत्तम केंदळे
निगडी – दि ७ मे २०२१
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्राने नुकताच निर्णय घेतला आहे की,18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे
त्या अनुषंगाने सध्या शहरात आज रोजी आठ ठिकाणी या वयोगटातील लसीकरण ऑनलाईन बुकिंग पद्धतीने चालू आहे
आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात उत्तम केंदळे यांनी यमुनानगर ठाकरे मैदान येथील स्केटिंग रिंग मध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरण लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे पुन्हा आग्रही मागणी केली आहे
प्रभागातील बहुतांश ज्येष्ठ आणि 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेतल्या आहेत लस घेतलेले नागरिक,युवक, युवती,महिला, पुरुष सर्वांच्या विचारणा या वयोगटातील व्यक्तींना सुद्धा लस लवकर द्यावी अशी मागणी प्रभागात सुद्धा होत आहे त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची भौतिक सुविधा व व्यवस्था स्केटिंग रिंग मध्ये उभारण्यात आल्या आहे असे केंदळे यांनी सांगितले
यमुनानगर ठाकरे मैदान मधील स्केटिंग रिंग मध्ये लसीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी 16 मार्च 2021 रोजी आयुक्त यांच्या कडे केली होती त्या अनुषंगाने 23 मार्च 2021 रोजी प्रत्यक्ष ठाकरे मैदान वरील लसीकरण केंद्र पालिकेच्या माध्यमातून चालू करण्यात आले आतापर्यंत तब्बल नऊ हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे सर्व सुविधा युक्त सुसज्य उभारलेले लसीकरण असल्याने प्रभागातील तसेच इतर भागातील नागरिक लस घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात नागरिक या लसीकरण केंद्र उपक्रम व नियोजनाचे कौतुक करत आहेत