सिनेमालाही लाजवेल अशी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची वेषांतर करून पाहणी..

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि ६ मे २०२१
पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते. त्यांनी मुस्लिम बांधवांसारखा वेश परिधान केला. वाढवलेली दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग. पिवळा सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क. बरोबर मियाँची बिवी म्हणून सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या.

खासगी टॅक्सी करून ही मियाँ बिवीची जोडी प्रथम रात्री १२.१५ वाजता पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली. आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८००० रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते आले. ‘रुग्णवाहिका वाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तुम्ही तक्रार दाखल करून घ्या’, असा आग्राह या जोडीने धरला होता. “हे आमचे काम नाही”, म्हणून त्यावेळी हजर पोलिसाने थेट नकार दिला. खरे तर नुकताच हुकूम काढला आहे की जर कोण्ही जास्त पैसे मागितले तर सक्त कारवाई करावी पण त्यांच्या कर्तव्यात कसूर दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दुसरा छापा रात्री १.३० वाजता हिंजवडी पोलिस स्टेशन आणि नंतर मध्यरात्री २ वाजता वाकड चौकीवर झाला. त्या ठिकाणी “आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला, अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गांभीर्याने सर्व प्रकऱणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली. आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली. येथे काम चोख बाजावल्याचे दिसत आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, वाकड आणि हिंजवडीत खूप चांगला अनुभव आला, मात्र पिंपरीत वाईट अनुभव होता. आपले कर्मचारी कर्तव्य बजावत खरोखर कसे काम करतो, तकारदारांना कशी वागणूक देतो याची तपासणी करण्यासाठी आपण यापुढेही अशाच प्रकारे अचानाक धाडी टाकणार आहोत. कुठे दारू, मटका अड्डे असो वा कुठलाही काळा धंदा ज्याला समाजाला त्रास होतो तो बंद झालाच पाहिजे. शहरात शून्य टक्का काळे धंदे हे आपले टार्गेट आहे. त्यासाठी आता आपण स्वतः गुप्ततेने कोणालाही न सांगता कुठेही अचानाक छापे टाकणार आहोत असे सांगितले.
very nice blog
af62fod23441k83b