भाजपचा जेष्ठ कार्यकर्ता कोरोनाने निखळला, प्रमोद निसळ कालवश…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ६ मे २०२१
पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे माजी शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांचे आज कोरोना मुळे निधन झाले. मनमिळाऊ आणि भाजपचे कट्टर सहकारी अशी त्यांची ओळख होती. कै. अंकुशराव लांडगे यांच्या बरोबरीने पक्ष वाढीसाठी चे काम केले ते आजपर्यंत सुरू होते.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती एकदम खालावली, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाचे वृत्त एकून धक्का बसला. एक हुशार व अभ्यासू वेक्तिमत्व गमावल्याचे दुःख भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.