नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
वारूळवाडी गावातील वॉर्ड क्र ६ व वॉर्ड क्र २ मधील काही भाग कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधात्मक क्षेत्र) म्हणून प्रशासनाने जाहीर केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली.
ग्रामपंचायत वारूळवाडी गावातील काही भागांमध्ये ५ पेक्षा जास्त प्रमाणात कोविड – १९ चे रुग्ण आढळून आल्याने व मृत्यू संख्येमध्ये वाढ होत असल्याने गावाच्या हितासाठी कोरणा विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून प्रशासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरिता ज्या भागात जास्त रुग्ण आढळले तो भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करून त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र फ्लेक्स व प्रतिबंधात्मक क्षेत्र असल्याची नोटीस लावण्यात आली. यावेळी सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य जंगल कोल्हे, स्नेहल कांकरिया, विनायक भुजबळ, पोलीस पाटील सुशांत भुजबळ,अतुल कांकरिया, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक वैभव सहाणे, पोलीस हवालदार एस डी सातपुते ,गोकुळ कोळी, कोरोना कमिटी सदस्य उपस्थित होते.