आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकले: वर्ष वाया..खासदार आमदार यांनी जियो टॉवर चालू करून ; दिलासा आणि आधार द्यावा..

कोपरे मांडवे प्रतिनिधी,

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. महात्मा फुले, सावित्री बाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांनी शिक्षण दारे उघडी केली त्याच महाराष्ट्र मध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ मोबाईल टॉवर उभारून चालू न केल्या कारणाने शिक्षण पासून वंचित राहावे लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्व भूमीवर सर्वच शाळा गेली एक वर्ष पासून बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथालने, या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे .कोणत्याही प्रकारच्या मोबाईल रेंज नसल्या कारणाने एक वर्ष वाया गेले आहे. जून महिना तोंडावर येऊन ठेपला आहे ,हे वर्ष पण वाया जाते की काय यांची चिंता पालक व्यक्त करत आहे.

जांभूळशी येते चार वर्षे पूर्वी जियो टॉवर उभा केला खरा पण,, तांत्रिदृष्ट्या कारणे सांगून ,व पुता चीवाडी (मांडवे ) या ठिकाणी दुसरा जियो टॉवर उभा केला. तिथे विद्युत पुरवठा डी. पी,मिळत नाही असे किरकोळ कारण दिले जात आहे.परंतु अद्याप तरी हे दोन्ही मोबाईल टॉवर चालू करण्यात आले नाही.

शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी या गावाचा १९ जून २०२० रोजी प्रशासकीय यंत्रणा घेवून गाव भेट दिली व अडी अडचणी समजून घेवून ,सभेला संबोधित करताना 15 दिवसा मध्ये जियो टॉवर चालू करतो असे आश्वासन दिले. वर्षे पूर्ण होत आले पण त्यांनी जे काही सूचना यंत्रणा केल्या त्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत.
सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच या भागतील प्रश्नांवर चिखलफेक करतात. आदिवासी समाज हा गेली अनेक वर्षे अतिशय शांत आणि प्रगल्भ राहिला आहे. समाजच्या भावना जेव्हा इतक्या तीव्र असतात .तेव्हा लोकप्रतिनिधी, यंत्रणा यांनी अशा विषयाचा “राजकीय खेळ” न मांडता मार्ग काढायचा असतो.

   आदिवासी समाजातील ८०ते ८५ टक्के लोकसंख्या अविकसित मागास किंवा अप्रगतच आहे.  कोरोना  मुळे विकास कामे पूर्ण करता येत नाही हे सांगण्यात काही तत्थही नाही.
  कोपरे, मांडवे, कोणताही प्रश्न हा निवडणूक आली आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही;तुमच्या सोबत आम्ही आहोत असे सर्वच पक्ष नेते  स्टंट करून गाजर ê