शक्यतो अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन जून महिन्यात करणेबाबत आणि पुरेसा रक्ताचा साठा उपलब्ध नसलेल्या रक्तपेढ्यामध्येच रक्तदान शिबिरे देण्याबाबत-ऋषी साबळे लढा रक्तदानाचा

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे – दि ६ मे २०२१
एखादी वेक्ती एखाद्या क्रमाने प्रेरित होऊन झपाटून आणि स्वतःला झोकून देऊन काम करते कोणत्याच फळाची अपेक्षा न करता जेव्हा हे तहहयात सुरू असते तेव्हा त्याचे काम लोकांपर्यंत पोहचते. असाच एक तरुण रक्तदान या कामात स्वतःला झोकून देऊन काम करत आहे आज त्याच्या कामाची दखल घेऊन त्याच्या संपर्कात आलेले च आज त्याच्या मदतीला शेकडो हात धरून आले. त्याचे काम पाहून प्रेरित होऊन त्याच्या खांद्याला खांदा लावून आज जुन्नर तालुक्यातीलचा दीपक सोनवणे, श्वेता पाटे, संकेत जोरी, आकाश कुटे, विमलेश गांधी, शुभम कुटे, डॉ पुरुषोत्तम बॉऱ्हाडे, डॉ प्रशांत कुऱ्हाडे, अमित कुटे यासारखे तरुण पुढे आले. त्याच्या कामाचे प्रेरनेने दिनेश कोंडा या तरुणाने प्रेरित होऊन तब्बल आठ वेळा प्लाझ्मा दान केले. आज ऋषी ने महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी व रक्तदान आयोजकांसाठी स्वतःच्या लढा रक्तदानाच्या टीम द्वारे मोलाचा सल्ला दिला आहे. 👇🏻


महाराष्ट्रातील सर्व रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना #लढा रक्तदानाच्या टिम व्दारे विनंती करण्यात येत आहे की, गेल्या महिन्यात संपूर्ण आणि या महिन्यात १ मे, २ मे या तारखांना अनेक ठिकाणी यशस्वीरित्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याबद्दल सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार.

येणाऱ्या ९ मे आणि १४ मे रोजी देखील अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि अजूनही अनेक आयोजकांचे रक्तदान शिबिरे आयोजनाकरिता संपर्क करण्यात येत आहे. सध्या ज्यांचे आधीच आयोजन झालेले आहे, त्यांनी ती शिबिरे घ्यावी. पण बाकी सर्वानी जे रक्तदान शिबिरे घेऊ इच्छितात त्या सर्वाना विनंती आहे की,
त्यांनी हिच रक्तदान शिबिरे मे महिन्याच्या शेवटी किंवा जुन महिन्यांच्या सुरवातीस घ्यावी.

याचे विशेष कारण की सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये या महिन्यात लागेल इतका पुरेसा साठा उपलब्ध आहे. आणि संपूर्ण रक्ताची वैधता ३५ दिवस आणि इतर रक्ताची साठवण कालावधी वैधता ४२ दिवसांची असते.

आणि येणाऱ्या काही दिवसात अनेक तरुण तरुणी लसीकरण केल्यामुळे रक्तदानासाठी लगेच पात्र ठरु शकणार नाही, त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा जाणवण्याची गंभीर समस्या उभी राहु शकते.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आयोजकाना नम्र विनंती आहे की आपण देत असलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तपेढ्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याची खातरजमा करुनच शिबिरे भरवावी