जुन्नर तालुक्यांतील चार कोविड सेंटरला पिंपरी चिंचवड पुणे येथील जुन्नर तालुका मित्र मंडळाचा अधार सुरक्षा साहित्याचे वाटप…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ५ मे २०२१
जुन्नर तालुका मित्र मंडळ,पुणे यांच्या वतीने कै.एस.आर.शिंदे सरांच्या स्मरणार्थ जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी, लेण्याद्री,ओझर व चाळकवाडी येथील कोविड सेंटरसाठी मदतसाहित्य देण्यात आले. तसेच “चला मारू फेरफटका” व “आपला परिवार” पुणे यांच्यावतीने १०० पी.पी.ई.किट देण्यात आले.


मागील आठवड्यात जुन्नर तालुका मित्र मंडळाचे सदस्य योगेश आमले, अण्णा मटाले, नवनाथ नलावडे, दीपक सोनवणे, रोहित खर्गे यांनी जुन्नर तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये जाऊन तेथे कोणकोणत्या गोष्टींची गरज आणि कमतरता आहे याविषयीची माहिती घेतली. त्यानुसार मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांच्या नेतृत्वात सगळ्या सुरक्षा रक्षक साहित्याची अण्णा मटाले , दिपक सोनवणे यांनी जमवाजमव केली आणि तालुक्याकडे रवाना केले.

 यावेळी जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे  डाँ.शुभांगी गाडे, डाँ.काळे व इतर कर्मचारी , सोमतवाडी येथे डाँ.अर्चना कर्पे व कर्मचारी , ओझर येथे मेडीकल आँफिसर डाँ.पाडवी,फार्मासिस्ट अबोली कोल्हे, व सर्व कर्मचारी, चाळकवाडी येथे उपसरपंच प्रदीप चाळक,बाळासाहेब अभंग तसेच शिवांजली शैक्षणीक संकुलाचे कोविडसेवा देणारे सेवक उपस्थित होते. यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रभाकर ढोमसे,कोषाध्यक्ष श्री. दिपक सोनवणे, चला मारू फेरफटका व आपला ग्रुपचे सुदाम शिंदे, वनरक्षक, निसर्ग व दुर्गसंवर्धक श्री.रमेश खरमाळे, श्रीकांत कदम, किरण कांबळे, सचिन गावडे हे उपस्थित होते.
           जुन्ररचे भूमीपूत्र पर्यावरणप्रेमी  सुदाम शिंदे यांनी स्वयंस्फूर्तीने या कामी PPE किट  ची मदत केल्याबद्दल अध्यक्ष व कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच मागील वर्षी जुन्नर तालुका मित्र मंडळाने आण्णा मटाले यांच्या सहकार्याने अलायन्झ ग्रुप आँफ पिंपरी चिंचवडचे वतीने केलेल्या मदतीबद्दल तसेच योगेश आमले यांच्या सहकार्याने राजुरी कोविड सेंटरला पंचवीस बेडची मदत करत आहे. तसेच पिंपरी पेंढार येथील कोविड सेंटर ला ही मदत करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी लागणारी  मदत गोळा करण्यासाठी अण्णा मटाले, योगेश आमले, रोहित खर्गे, 

ऍड. संतोष काशिद, नवनाथ नलावडे, विजय ढगे,उल्हास पानसरे, व्याख्याते भाऊसाहेब कोकोटे तसेच सर्व कार्यकारिणी व सभासद
यांचेही मंडळाचे वतीने दिपक सोनवणे यांनी आभार मानले. तसेच लेण्याद्री ग्रामस्थ व कोविड सेंटरच्या वतीने दिलेल्या मदतीबद्दल लेण्याद्री गावच्या पोलिस पाटील कविता बिडवई, गिरीजात्मक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजेश बिडवई, लेण्याद्री देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे यांनी तर चाळकवाडी कोविड सेंटरचे वतीने शिवांजली शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष शिवाजी चाळक व उपसरपंच प्रदीप चाळक यांनी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *