पुणे पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर अहमदनगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा असणारे दोन हजार बेडचे सुसज्ज जेंम्बो कोविड केयर सेंटर सुरू करावे- मारुती भापकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री यांना निवेदन

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ३ मे २०२१ अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याणे वाढत असून जिल्ह्यात रोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून येत आहेत. दररोज ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत आहेत. आज जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ८१ बाधित रुग्ण आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात, खाजगी रुग्णालयात आयसीयु,ऑक्सिजन बेड व्हेटिलेटर बेड मिळत नाहीत. औरंगाबाद,बीड जिल्ह्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड,व्हेटिलेटर बेड अहमदनगरच्या रुग्णालयात मिळवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र त्यांनाही बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना पुणे पिंपरी चिंचवड शहरात घेऊन जावे लागते. मात्र पुणे पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्ण संख्या प्रचंड असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अहमदनगर, औरंगाबाद,बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असून अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. पुणे,पिंपरी-चिंचवड शहरावर अहमदनगर,औरंगाबाद,बीड जिल्ह्याच्या रुग्णांचा ताण कमी होण्यासाठी तसेच अहमदनगर, औरंगाबाद,बीड जिल्ह्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी पुणे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानावर २००० बेडचे सुसज्य जम्बो केयर सेंटर युद्ध पातळी उभारण्याचा निर्णय व्हावा. यामध्ये ५०० ऑक्सिजन बेड, ३०० व्हेंटिलेटर बेड व १२०० साधे बेड असावेत. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी जिल्हा प्रशासनाने तज्ञांच्या सहकार्याने करावी. तसेच रुग्णांवर उपचारासाठी यंत्रसामुग्री, औषधे तसेच रेमडिशिवर इंजेक्शन,सुसज्ज रुग्णवाहिका, ऑक्सीजन प्लांट आदी सुविधा तयार कराव्यात. अहमदनगर,औरंगाबाद,बीड आदि जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी,कामगार,गोरगरीब दलित,आदिवासी अत्यंत गरीब असून त्यांना या महामारीमध्ये रुग्णालयाचे खर्च परवडत नाहीत. त्यामुळे आमच्या या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा. असे निवेदन मंत्र्यांना पाठवले व त्याची प्रत पुणे व अहमदनगरच्या विभागीय आयुक्तांनीही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *