जेष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांना बडोद्यातील सयाजीराव गायकवाड पुरस्काराने सन्मानित…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांना बडोदा ( गुजरात ) येथील मराठी वाड्मय मंडळाचा महाराज सयाजीराव गायकवाड पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह, व रोख रक्कम रुपये ५०००/-असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री.पोतदार यांचे ‘आक्रीत’, ‘गुंजेचा पाला’ व ‘एका सत्याचा प्रवास’ हे कथासंग्रह तर
‘ गुंतले हृदय माझे ‘ या चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली होती.

बबन पोतदार यांनी आकाशवाणी वरील व दूरदर्शनवरील अनेक श्रुतीका लिहिल्या आहेत. तसेच अनेक शाळा, कॉलेज व इतर कार्यक्रमात मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत. पोतदार यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.त्यामध्ये प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, श्रीपाल सबनीस, राजन लाखे आदी मान्यवर सहित्यिक यांनी शुभेच्छा दिल्या.