मंचर मधील श्री गुरुदेवदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदेवदत्त गणेश मंडळ (पाटीलवाडा) यांचे कार्य स्तुत्यपूर्ण – वैद्यकीय अधीक्षक डॉ.नितीन देवमाने

                 कोरोनाच्या सद्य स्थितीत मंचर मधील पाटीलवाडा येथील दोन मंडळांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने उपजिल्हा रुग्णालय मंचर ला साऊंड सिस्टम भेट दिली.
   कोरोनाच्या या कठीण काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची बऱ्याच वेळा हेळसांड होऊन रुग्णास त्यातूनच बऱ्याच वेळा मानसिक नैराश्य येत असल्याचे चित्र दिसत आहे हे लक्षात घेऊनच मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक मा. डॉ. नितीन देवमाने यांनी केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत मंचर येथील  श्री गुरुदेवदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदेवदत्त गणेश मंडळ (पाटीलवाडा) यांनी स्पीकर वॉलमाउंट WS41 चे 4,  स्पीकर वॉलमाउंट WS51 चे 4 असे एकूण 8 स्पीकर व एम्प्लिफायर वॅट, माईक साऊंड सिस्टीम वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. नितीन देवमाने, आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. सुरेश ढेकळे,  वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार यांचे उपस्थित भेट म्हणून मंचर उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना मा. डॉ. देवमाने म्हणाले की सदर साऊंड रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे उपचार चालू असलेल्या वार्ड मध्ये लावण्यात येईल तसेच यावेळी रुग्णांची मानसिकता सकारात्मक होण्याच्या दृष्टीने भक्तिगीते, हलके-फुलके संगीत मंद आवाजात लावण्यात येईल जेणे करून रुग्णालयातील वातावरण प्रसन्न राहून रुग्णांना मानसिक आधार मिळून त्यांच्यातील सकारात्मक विचारांची शक्ती जागृत होण्यास मदत होईल या द्वारे त्यांच्यावर औषधोपचाराचा ही योग्य परिणाम होऊन रुग्ण लवकरात लवकर कोरोनातून रिकव्हर होण्यास मदत मिळेल. यावेळी त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून मंचर मधील इतर मंडळांनीही त्यांच्या परीने कोरोनाशी लढा देण्याऱ्या प्रशासनास साहाय्य करण्याचे आवाहन केले.
      या वेळी श्री गुरुदेवदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदेवदत्त गणेश मंडळा चे विजय (बाळासाहेब) थोरात पाटील, सदानंद थोरात पाटील, नरेंद्र (पापा) घुले, जयेश थोरात पाटील, बंटी मोरडे हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *