वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने एकावर” नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

नारायणगाव (किरण वाजगे)
 नारायणगाव येथील वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्या प्रमाणे नारायणगाव पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


   याबाबत अधिक माहिती अशी की, वारुळवाडी येथील आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.आभा त्रिपाठी या वैद्यकीय सेवेत आहेत.शनिवार (दि.२४) साडेचारच्या सुमारास सतीश बनकर हा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आला. त्याने डॉ. त्रिपाठी यांच्याकडे ई-पास देण्याची मागणी केली.या वेळी बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपली आहे. त्यामुळे तुम्हाला ई-पास देण्यात येणार नाही.याबाबत तुम्ही येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर त्यांना भेटा असे डॉ.त्रिपाठी यांनी बनकर यांना सांगितले.
दरम्यान प्रभारी वैद्यकीय अधिकारी न आल्याने बनकर याने डॉ.त्रिपाठी आणि आरोग्य कर्मचारी यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली.दवाखाना तुमच्या बापाचा आहे काय असे म्हणून डॉ.त्रिपाठी यांना तुझे थोबाड फोडीन.अशी धमकी दिली.याबाबत डॉ.त्रिपाठी यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.डॉ.त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३,५०४,५०६ महराष्ट्र सेवा संस्था अर्थात हिंसक कृती व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध)अधिनियम २१० चे कलम ४ प्रमाणे सतीश बनकर याचेवर गुन्हा दाखल केला आहे.