शिरूर ग्रामीण (रामलिंग) येथे कोव्हीड प्रतीबंधक लसिकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतीसाद, पहिल्याच दिवशी १४७ जणांचे लसीकरण…

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. परंतु रामलिंगच्या ग्रामस्थांना रामलिंग येथेच लस मिळावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. त्यानुसार शिरूर ग्रामीण ग्राम पंचायतने शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन दी २४ एप्रिल २०२१ रोजी रामलिंग येथील सांस्कृतिक भवनात लसिकरणाला सुरुवात झाली.

 आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे रामलिंग येथे लसीकरण सुरू झाल्याने, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. 

शिरूर कृ .ऊ. बा. समीतीचे माजी सभापती शशीकांत दसगुडे, रामलिंगचे सरपंच नामदेव जाधव, ऊपसरपंच ऊज्वला नेटके, ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, सामाजिक कार्यकर्ते शरद पवार, ग्रा पं कर्मचारी शिवाजी दसगुडे, सेवानिवृत पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्याचे सचिव संपत जाधव, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन बोऱ्हाडे, यशवंत कर्डीले, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाली. या लसिकरणासाठी वयोवृद्धासह ४५ वर्ष वयावरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी एकुण १४७ नागरिकांनी लसीकरण केले. कोव्हिड चे नियम पाळत, अतिशय शिस्तबद्ध वातावरणात लसीकरण पार पडले. लसीकरण शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच नामदेव जाधव यांच्यासह, कृ. ऊ. बा. समिती शिरुरचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी आदर्श सरपंच अरूण घावटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल वर्पे, सरपंच तुषार दसगुडे, माजी सरपंच रामदास जामदार, ग्रा पं