महापालिकेत कार्यरत असलेले कोविड योद्धे व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र बेड राखून ठेवावे- नगरसेवक शत्रुघ्न काटे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २४ एप्रिल २०२१
आपल्या शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या विनंतीनुसार आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांसाठी अतिशय सुसज्ज वॉर्ड सर्व सोयींनी युक्त तयार केला असून कालच डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांनी 23 एप्रिल पासून कार्यान्वित करण्यात केला आहे त्याबाबत कुलपती पी डी पाटील यांचे अभिनंदन.


ज्याप्रकारे पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत त्यांना जशी गरज होती त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत काम करणारे डॉक्टर, पारिचारिका , सफाई कामगार, फ्रंट वर्कर हे देखील आपली जबाबदारी जीवावर उदार होऊन पार पाडत आहेत. त्यांच्यासाठी महानगरपालिकेने त्वरित एक सुसज्ज वार्ड तयार करून सेवेत कार्यान्वित करावा अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बप्पू काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली . यावेळी त्यांच्या समवेत स्थायी समिती सभापती ऍड नितीन ज्ञानेश्वर लांडगे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.