गाव करील ते राव न करी. कोरोना रोखण्यासाठी गावातच कोविड सेंटर उभारनार पिंपरी पेंढार युथ सोशल फौंडेशन चा उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी पेंढार -दि २० एप्रिल २०२१
इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकते निर्णय घेणे महत्वाचे असते. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील पिंपरी पेंढार सोशल फौंडेशन यांच्या वतीने युवावर्ग पुढे येऊन एक स्तुत्य उपक्रम राबवणार आहेत.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सध्या पूर्ण देश होरपळत असून जुन्नर तालुका खूप पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यासाठी येथील युवकांना एक कल्पना सुचली आणि त्याचा तातडीने अवलंबही सुरू केला. कोणतीही गोष्ट करताना आर्थिक बाब लागतेच आणि सर्वप्रथम या मंडळाचे युवा नेतृत्व (तसे नेतृत्व सर्वच करतात) विमलेश गांधी यांनी आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला साद घालत सर्व प्रथम राज्य सरकारचा उत्कृष्ट तलाठी चे मानकरी ठरलेले याच गावातील राजेश ठुबे समोर येऊन त्यांनी तरुणाईच्या या उपक्रमाला दहा हजार रु ची देणगी जाहीर करून सुपूर्द ही केली. त्यालाच साद घालत स्वतः उद्योजक विमलेश गांधी यांनी ४०००० रुपयांची देणगी जाहीर करून जमाही केली. त्यानंतर अरुण पोटे यांनी 5000 रु तर कोण्ही 2121 रु तर 1100 रु च्या स्वइच्छा देणगी सुपूर्द करून सर्वप्रथम एक एक करत तब्बल दोन लाखापर्यंत रक्कम जमा झाली आणि मदतीचा ओघ सुरूच आहे.


संकल्पना अशी की सर्वप्रथम पूर्ण गावातील एकूण एक वेक्तीची कोरोना टेस्ट करायची. कारण काही लोक अंगावर काढतात आणि या रोगाचा प्रादुर्भाव इतरांनाही होतो. त्यामुळे सरसकट सर्वांची चाचणी करायची आणि त्यात आढळलेले रुग्ण मराठी शाळेत विलगीकरण करून ठेवायचे. त्यांना उपचार द्यायचे आणि ठणठणीत करून घरी पाठवायचे. ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांना उपचार दयायचे. ज्यांना फक्त गोळ्या औषधे हवी त्यांना गोळ्या औषधे देऊन विलगिकरन गावातील छोट्या कोविड सेंटर मध्येच फौंडेशन चे डॉ पुरुषोत्तम बॉऱ्हाडे, डॉ पराग पडवळ यांच्या माध्यमातून एक स्वतंत्र टीम तयार करून उपचार द्यायचे.
जास्त च त्रास एसेल तर लेण्याद्री किंवा ओझर च्या कोविड सेंटर मध्ये पाठवायचे.
यामुळे गावातील कोरोना बाधित असणारे रुग्ण सापडतील आणि लवकर योग्य वेळी उपचार घेऊन गावातच ठीक करायचे म्हणजे त्यांना शहरात व्हेंटिलेटर बेड साठी वणवण फिरावे लागणार नाही.
थोडक्यात गावच सीलबंद करून ठेऊन गावातच रुग्ण बरे करायचे हा उपक्रम सर्व प्रथम पिंपरी पेंढार या गावांमध्ये राबवला जातोय . त्याला सगळ्या गावकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून उपक्रमात सगळे सहभाग घेताना दिसत आहेत. याअगोदर फौंडेशन च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रक्तदान आवाहन अभियानाला युवकांनी भरभरून प्रतिसाद देत 140 बाटल्यांचे संकलन करून सामाजिक भान जपले. आता गरजू रुग्णांना सभासदांकडून प्लाझ्मा दान करून खूप मोठे सामाजिक भान ठेवून उपक्रम सुरू असून गावातील तालुक्यातील रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठीची धडपड या युवकांची दिसून येते. मागच्या वर्षी कोरोनाकाळात गरजू व गरिबांना जेवणाचे डब्बे व धान्याच्या किट चे वाटप केले. वृक्षारोपण तर नेहमीच असते व झाडांना जगवण्यासाठी कडक उन्हात सर्व झाडांना टँकर मार्फत पाणी देण्याचे कामही सुरू असते.
आता शाळेची पाहणी सुरू असून साफसफाई आणि नंतर कलेक्टरची भेट घेऊन परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात कोविड चा सामना करण्यासाठी हे कोविड योद्धे सज्ज आहेत.
आणि त्यांचा हा आदर्श नक्कीच राज्यातील सर्व गावे घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
या उपक्रमात पोलीस पाटील संकेत जोरी, राघव पोटे, कल्पेश कुटे, महेश कुटे, डॉ सचिन शिंदे , राजू कुटे, सुदाम जोरी, जालिंदर चव्हाण, अशोक डेरे, शलेंद्र जाधव, सुनील जाधव, केशव पठारे, विशाल कुटे, गणेश गायकवाड, राजू मोझे, राहुल जाधव, सचिन जाधव, व असंख्य तरुणाईचा सहभाग असून हा उपक्रम लवकरच सुरू होणार असल्याचे डॉ पुरुषोत्तम बॉऱ्हाडे व राघव पोटे यांनी सांगितले.
तरुणाईच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास आपला आवाज च्या टीमकडून मनस्वी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *