पिंपरी-चिंचवड मधील गोरगरीब मृत कोरोना रुग्णांच्यासाठी स्मशानभूमी बाहेर मर्च्युरी रूम उभारावी. स्टुडंट एज्युकेशन सोसायटीचे विजय सोनावले यांची मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २० एप्रिल २०२१ स्टुडंट एज्युकेशन सोसायटी, नेवाळे वस्ती, चिखली या संस्थेच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच या वाढत्या संख्येमुळे विद्युतदाहिनी असलेल्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहांची रांग लागू लागली आहे.
महोदय, मुळात ज्या घरातील व्यक्तीचे निधन झाले आहे असा घरातील लोक कोरोना बाधित असतात.त्यातच घरातील व्यक्ती दगावला आणि त्यांची मानसिक अवस्था वाईट असते.अशावेळी आपल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या नातलगांना तासन्तास स्मशानभूमीत वाट पाहावी लागत आहे.
महोदय आपणास विनंती की, आपला समाज भावनाप्रधान आहे. फक्त व्यक्तीबाबत आपला संवेदनाखूपच हळव्या असतात त्यामुळे मृत व्यक्तींना अंतिम प्रवास व्यवस्थित व्हावा ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी ठरते,आपण शहराचे आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून करुणा च्या संदर्भात खूपच चांगले लोकहितकारी निर्णय घेतले आहेत. यामुळे आपल्या कडून या महामारी च्या संदर्भात अनेक चांगल्या उपाययोजनेची अपेक्षा देखील आहे.
आपण आपल्या या भावनाप्रधान लोकांच्या भावनांचा विचार करून. शहरातील स्मशानभूमी लगत मृतदेह व्यवस्थित ठेवण्यासाठी मर्च्युरी रुमची व्यवस्था करावी ही विनंती.