विभागीय संपादक रामदास सांगळे
बेल्हे दि.२० – राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दुध व्यावसायिक संस्थेच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब हाडवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रातील नामवंत असलेली राजुरी येथील गणेश सहकारी दुध संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवार (दि.२०) रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष गोविंद औटी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब हाडवळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी लक्ष्मण घंगाळे यांची तर सचिव पदी निवृत्ती हाडवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधीका-यांचे गावातील सर्व संस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.