मंचर , 20 एप्रिल
प्रतिनिधी ,अमर कराळे
मंचर शहरात येत्या बुधवार दि.२१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं.५ वाजेपर्यंत शहरातील सर्व नागरिकांची कोरोना (अँटिजेन ) चाचणी करण्याचे नियोजन मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. शहरातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना मंचर ग्रामपंचायतमार्फत करण्यात येत आहे. त्याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून बुधवारी सदर कोरोना चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चाचणी करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.संभाव्य रुग्ण ओळखून तसेच एखाद्या व्यक्तीस प्राथमिक लक्षणे असल्यास त्यावर तातडीने उपचार करून कोरोनाचा सोभोवतली होणारा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे हा कोरोना प्रसाराची साखळी तोडण्याचा प्रभावी मार्ग आहे.
त्यादृष्टीने मंचर शहरातील सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची चाचणी करून घेऊन कोरोना हद्दपार करण्याच्या या लढाईत प्रशासन व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन मंचर ग्रामपंचायत चे उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले.
कोरोना चाचणी करण्यासाठी शहरात चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे ही ठिकाणे खालील प्रमाणे
वार्ड क्र.१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरडेवाडी – मंचर,
अंगणवाडी केंद्र इमारत, मुळेवाडी मंचर
वार्ड क्र.२ – चौंडेश्वरी माता मंगल कार्यालय, मंचर
वार्ड क्र.३ – पंचाचा वाडा, बाजारपेठ, मंचर
वार्ड करा.४ – मल्हार मंगल कार्यालय, मंचर
वार्ड क्र.५ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोंढेमळा
वार्ड क्र.६ – अस्मिता भवन.