
रोहित खर्गे
विभागीय संपादक
पुणे – दि १९ एप्रिल २०२१
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात वयाच्या ७८ व्या वर्षी पाण्यात घेतला अखेरचा श्वास. त्यांच्या “कासव ” या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही राष्ट्रीय फ़िल्म संग्रहालय येथे एका कार्यक्रमात होतो तेव्हा तेथेच ही बातमी समजली तेव्हा त्यांना कासव विषयी च्या पुरस्कारबद्दल खूप आनंद झाला होता. व त्या सिनेमाच्या निर्मातीविषयी भरभरून बोलल्या होत्या. त्यांचे सिनेमे नेहमी वेगळ्या धाटणीचे असत त्यातून काहीतरी सामाजिक संदेश देणारे सिनेमे बनवण्यावर त्यांचा भर असे.
अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासोबत मिळून अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ हे त्यांचे लघुपट गाजले. पुढे त्यांनी ‘दोघी’ (१९९५) हा चित्रपट केला. ‘बाधा’, ‘नितळ’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट होता.
भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला.
फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. त्या पुण्यातील कर्वे इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसमध्ये काम केले होते.