आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन..

मंचर प्रतिनीधी , अमर कराळे
दि.18/04/2021

कोरोनाच्या प्रदूर्भावात राज्यात आलेला रक्ताचा तुटवडा पाहता शरदचंद्र पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार आंबेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मंचर येथे करण्यात आले…

कोरोना ची वाढती परिस्थिती विचारात घेता शासन नियमांचे पालन करून रक्तदान शिबिरास
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला…

रक्तदान शिबिरामध्ये 256 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास शरद बँकेचे चेअरमन देवेंद्र शहा,भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली…

कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस मंचर चे शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ससून रक्तपेढी चे अरुण भरडे, समाजसेवा अधीक्षक,
यांनी कोरोना काळात रक्तदानाचे महत्व सांगितले…

या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन ससून रक्त पिढी ने केले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांतर्फे एक N95 मास्क, सॅनिटायझर, टीशर्ट व प्रशस्तीपत्र देण्यात आले…

  • रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले…