आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशनाना घोडेकर यांचे निधन

घोडेगाव दि. 17

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,समता परिषद आंबेगांव तालुका अध्यक्ष रमेशनाना घोडेकर ( वय -७७ ) यांचे अल्पशा अजाराने आज शनिवारी सकाळी दु :खत निधन झाले.
आं.ता.वि.वि.चे उपाध्यक्ष, दुध वाहतुक संस्था,सावतामाळी ट्रस्ट,ग्रामपंचायत तसेच घोडेगावातील विविध संस्था अनेक ठिकाणी नाना नेतृत्व करत होते.
राज्याचे गृहमंञी दिलीपरावजी वळसे पाटील यांचे विश्वासु सहकारी ते होते.
माजी आमदार स्व.दत्ताञय वळसे पाटील व स्व.बी.डी.काळे यांच्यापासुन ते राजकारणात सक्रिय होते.
अनुसया महिला पतसंस्थेच्या संचालिका ज्योतीताई घोडेकर यांचे ते सासरे होते.
नानांच्या निधनामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली असुन त्यांना २ भाऊ, २ मुले,सुना,नातवंडे असा मोठा परीवार आहे.