नारायणगाव येथील वाईन शॉप चालकावर गुन्हा दाखल..जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कोरोना १९ च्या आदेशाचे उल्लंघन

नारायणगाव,दि. ७ एप्रिल

कार्यकारी संपादक, किरण वाजगे
नारायणगाव तालुका जुन्नर येथील खोडद रोडवर असलेल्या शेरकर वाईन शॉप या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये बेकायदा गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे वाईन शॉप चालक गुरुकांत श्यामलाल यादव (वय ३७, राहणार पाटे आळी, नारायणगाव) याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८,२६९, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ यानुसार नारायणगाव पोलीस स्थानकात मंगळवार दिनांक ६ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण वसंत लोहोटे यांनी नारायणगाव पोलिसात दिली आहे. दरम्यान शेरकर वाईन शॉप या दुकानासमोर प्रमाणापेक्षा खूप जास्त गर्दी केल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *