शहरातील पवना आणि इंद्रायणी नद्यांना सुद्धा नरेंद्र मोदींचे नाव द्या – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ५ एप्रिल २०२१
नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी भाजप कडून गेल्या ४ वर्षात काहीही उपाय योजना झाल्या नाहीत.
राष्ट्रवादी पदवीधर चे कार्यकर्ते यांनी नदीच्या व्यथा नाव नियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्या समोर मांडल्या.
नद्यांनी गटाराचे स्वरूप घेतले आहे.
जलपर्णी साठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात पण नद्यांना गटारगंगा झाल्या आहेत.त्यामुळे निदान नरेंद्र मोदींचे नाव दिले तर नावासाठी का होईना काहीतरी काम होईल म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना असे उपरोधिक निवेदन पदवीधर संघातर्फे देण्यात आले.
यावेळी पर्यावरण अहवालावर सुद्धा चर्चा झाली, आणि तो फक्त कॉपी पेस्टचा माहिती अहवाल आहे असे माधव पाटील यांनी सांगीतले.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघ शहर अध्यक्ष माधव पाटील , कार्याध्यक्ष युनूस शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष अभिजित घोलप आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *