सोशल मीडियाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी “महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेची स्थापना!
पिंपरी चिंचवड सोशल मिडिया परिषदेच्या नूतन संघाचे आज झाले दिमाखात उदघाटन!
पिंपरी- ३ एप्रिल २०२१
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने एक पाऊल पुढे टाकत सोशल मिडिया चालविणाऱ्या व त्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या हेतूने “महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद”या नावाची नवीन संघाची स्थापना केली असून पिंपरी चिंचवड संघाचे उदघाटन आज मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,जिल्हा समन्वयक सुनील जगताप,प्रसिद्धी प्रमुख सुनील वाळुंज,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले इत्यादींच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी सर्वांचे स्वागत महाराष्ट्र सोशल मीडियाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या संकल्पनेतुन व किरण नाईक व परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न “महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आली असून मा एस एम देशमुख हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सोशल मीडियाच्या पत्रकाराचे हे संघटन लवकरच राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवर उभारले जाणार आहे व त्याद्वारे सोशल मीडियाच्या पत्रकारांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.
पिंपरी चिंचवडचे सूरज साळवे हे अध्यक्ष!
“महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद” पिंपरी चिंचवड संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून
ती पुढील प्रमाणे आहे १) सुरज साळवे – अध्यक्ष
२) सायली कुलकर्णी – समन्वयक
३) सुनिल पवार – उपाध्याक्ष
४) सुमित झा – उपाध्यक्ष
५) दादाराव आढाव – उपाध्यक्ष
६) विनायक गायकवाड – सचिव
७) चिराग फुलसुंदर – कोषाध्यक्ष
८) संतोष जरड – कार्यकारणी सदस्य
९) माधुरी कोराड – कार्यकारणी सदस्य
१०) गणेश मोरे – कार्यकारणी सदस्य