लाइफपॉइंट रुग्णालयात जोडला इसमाचा अंगठा…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी:- दि ३ एप्रिल २०२१
वाकड येथील लाइफपॉइंट रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून वाचवला ४० वार्षिय इसमाचा तूटलेला अंगठा.
प्रवीण ओव्हाळ ( वय ४०, टाकवे खुर्द,ता मावळ) असे या जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.
श्री. ओव्हाळ यांच्यावर आरोपीने किरकोळ करणाने झालेल्या वादातून तलवारीने वार केले.
ओव्हाळ यांना तातडीने वाकड येथील लाइफपॉइंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. जख्मी अवस्थेत ओव्हाळ यांचा अंगठा वाचेल असे वाटत नव्हते. कारण अंगठा पूर्ण तुटला होता.अंगठा किंचीत चामडीला अडकलेला होता. अवघ्या चार तासांत अंगठा पुन्हा जोडण्याचे कार्य पूर्ण केले.
सर्जन डॉ.विक्रम वाघ,प्लॅस्टिक सर्जन डॉ.
सुरेश संघवी, डॉ.कैलास बोथारे यांच्या टीमने शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या डाव्या अंगठाचे सूक्ष्म रक्तवाहिन्यासंबंधी जोडल्याचे काम केले.

डॉ.सपना सगरे आणि भूलतज्ज्ञ डॉ. जगदीश जाधव आणि सहकारी यांनी शस्त्रक्रिया सुमारे 6 तास केली.
रक्तवाहिन्या आणि नसा एकत्रित जोडून अंगठ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली .
शस्त्रक्रियेनंतर 10 व्या दिवशी रुग्णाला अंगठा देऊन डिस्चार्ज करण्यात आला.
डॉ. वाघ म्हणाले, “अंगठा हा हाताचा एक मुख्य कार्य करतो. अत्यंत वेदनादायक मानले जाते, हे पुनर्वसन शक्य होते. कारण रूग्णालयात गोल्डन हवर मध्ये रुग्णालयात रुग्ण दाखल झाला होता. आणि रात्री वेळेवर शस्त्रक्रिया केल्याने हे शक्य झाले”.