राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्यावर कार्यवाहीचे आदेश…..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

शिलवंत कुटूंबियांचा मनपा ठेकेदारीत सहभाग जितेंद्र ननावरे यांचे आरोप….
विभागीय आयुक्तांनी दिले कार्यवाहीचे आदेश…..

पिंपरी :- २ एप्रिल २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंबियांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मास्क पुरवठा निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन त्यांच्या कंपनीस महानगरपालिकेने रक्कम देखिल अदा केली आहे. अशी तक्रार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली होती.
ननावरे यांच्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी त्यांचे पद रद्द करुन नगरसेवक म्हणून असलेले सर्व लाभ तात्काळ थांबविणेबाबतची मागणी ननावरे यांनी केली होती. या विषयी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी सदर अर्जावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करुन अर्जदार यांना कळविण्यात यावे असे आदेश पुणे विभागीय कार्यालयातून 26 मार्च रोजी प्र. उपायुक्त, नगरपालिका प्रशासन, डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिले आहेत. तसे पत्र पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडून ननावरे यांना देण्यात आले.
या विषयी ननावरे यांनी 10 मार्च 2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्या वेळी ननावरे यांनी असे आरोप केले होते की,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 20 च्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंब सदस्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. महानगरपालिका अधिनियम 11 मधील पोटकलम ‘ड’ किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2) खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील तर, त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल. मधील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राव्दारे दि. 10 मार्च 2021 रोजी केली असल्याची माहिती पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली होती.

सोबत ननावरे यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिलेले पत्र

मा. सौरभ राव,
विभागीय आयुक्त,
विधानभवन पुणे
विषय :- प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका सौ. सुलक्षणा शिलवंत – धर यांनी निविदाप्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी त्यांचे पद रद्द करून नगरसेवक म्हणून असलेले सर्व लाभ तात्काळ थांबविणेबाबत…
अर्जदार – श्री. जितेंद्र बाबासाहेब ननावरे, माजी नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका,