पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियमावली कडक करा, परंतु लॉकडाउन नको – गजानन बाबर, मा. खासदार

रोहित खर्गे
विभागीय संपादक

दि २५ मार्च २०२१
पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, निश्चितपणाने नियमावली कडक करण्याची गरज आहे यात कोणतीही ही शंका नाही परंतु असे करत असताना लॉकडाउन हा पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी , कामगारवर्ग, हातावरपोट असलेले व्यापारी, उद्योजक, मजूरवर्ग , औद्योगिक कारखाने, हॉटेल्स व्यवसायिक, रिक्षावाले, टपरीधारक, सर्वसामान्य विक्रेते, छोटे उद्योजक, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते, दुकानदार यांचाही आपण विचार करावा आज आपण जर पाहिले तर जवळपास एक वर्ष वरील सर्वच वर्ग आर्थिक झळीला सामोरे जात आहेत, जर लॉकडाऊन केला तर वरील वर्गाला आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागेल , तसेच या वर्गाला आवक जर बंद झाली तर ते आपले उदरनिर्वाह कसे करणार तसेच त्यांचे कर भरणे थांबणार आहे का व विविध कर तरी कुठून भरणार? याचाही शासनाने विचार केला गेला पाहिजे. असे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

माननीय मंत्री महोदय, सध्या आपण जर परिस्थिती पाहिली व सर्वतोपरी विचार केला तर लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच रोखण्याची गरज आहे यासाठी कडक नियमावलीचा अवलंब केला गेला पाहिजे, आपण आज जर पाहिले तर मास्क लावून, सोशल डिस्टंसिंग ठेवले व सॅनिटायझर वापर या त्रिसूत्रीचा  आपण जर व्यवस्थित पणे वापर केला, तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चितच फायदा होईल त्यासोबत दुकानाबाहेर रांग लागते त्याकरता दुकानदारांनी मार्किंग करणे, प्रभागवाईज देखरेखीकरता स्कॉड निर्माण करणे, लोकांना घाबरू नये यासाठी समुपदेशन करणे, त्यांच्या मनातील भीती घालवणे यासाठी स्वयंसेवी संस्था डॉक्टरांचे मार्गदर्शन याचे नियोजन करणे हे उपयोगी पडेल .लोकांना कोरोनाच्या काळात व्यवस्थितपणे आरोग्यसेवा कशी देता येईल व संसर्गही होणार नाही याची काळजी कशाप्रकारे घेता येईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.

आज आपण जर पाहिले तर कोरोनाच्या काळात नागरीकांचा आर्थिक कणा अक्षरशा मोडला आहे, व एखाद्या रुग्णाला खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले तर खाजगी रुग्णालय खूप मोठ्या प्रमाणात बील करते यामुळे महानगरपालिकेने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अê