मुंबई – बेंगलोर रस्त्यावर ताथवडे व पुनावळे, तसेच भूमकर चौक, वाकड येथे नविन सब- वे साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी:- दि २४ मार्च २०२१
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मुंबई – बेंगलोर रस्त्यावर ताथवडे व पुनावळे येथे नविन सब-वे करणे, भूमकर चौक, वाकड येथे नविन सब- वे करणे व महापालिका हद्दीतील वाकड ते रावेत किवळे सर्व्हिस रस्ता विकसीत करणे कामी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करणे बाबत नगरसेवक राहुल कलाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत निवेदन दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगरसेवक राहुल कलाटे यांनी शहरातील रस्त्याबाबत निवेदन दिले. कलाटे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहराचा औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. तसेच हिंजवडी आयटीपार्क व मुंबई- पुणे बंगलोर हायवे जवळ असल्याने हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या परिसरातून मुंबई बेंगलोर,पुणे हैदराबाद,पुणे नाशिक,पुणे अहमदनगर रस्ता इत्यादी महत्वाचे रस्ते जात असल्याने या भागात वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. याबाबींचा विचार करून या भागातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी कामे करणे आवश्यक आहे.
मुंबई बेंगलोर बाह्य वळण रस्ता, वाकड ते किवळेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामधुन जात आहे. ठिकाणी रहिवाशी भाग वाढत असलेने गृहनिर्माण संस्था निर्माण होत आहेत. सदर रस्त्यावर भुमकर चौक या ठिकाणी या रस्त्याचेदोन्ही बाजुस मनपा विकास आराखड्यातील ४५ मीटर रुंदीचा रस्ता महापालिकेमार्फत विकसित करणेत येत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांचे मार्फत या ठिकाणी २ लेन लेनचा सबवे विकसित केलेला आहे. सदर सब-वे सद्य स्थितीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अपुरा पडत आहे. व त्यामुळे या सब-वे खाली मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ४ लेनचा सबवे विकसित करणे आवश्यक आहे. याबाबत यापुर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांना पिंपरी चिंचवड महापालिका मार्फत पत्रव्यवहार करणेत आलेला आहे. तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ४ लेनचा सब-वे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांचे मार्फत विकसीत करणेत यावा.
पुनावळे व ताथवडे येथिल सब-वे कमी उंचीचे व कमी रुंदीचे असलेने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वरील दोन्ही ठिकाणी नव्याने ४ लेनचा सब-वे तयार करणे आवश्यक आहे. सदर सब-वेची रुंदी व उंची वाढविणे आवश्यक आहे. याबाबतही महानगरपालिके मार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे

या रस्त्याची पिंपरी चिंचवड शहरामध्ये ८.६० किमी लांबी व ६० मी रुंदी असून त्यालगत दुतर्फा १२ मी रुंदीच्या सेवा रस्त्याचे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये