होळी व धुलिवंदन सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई- डॉ राजेश देशमुख जिल्हाधिकारी, पुणे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे :- दि २४ मार्च २०२१
पुणे जिल्ह्यात व पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत चालला आहे. व झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.


त्या अनुषंगाने साजरे होणारे होळी व धुलिवंदन सण ,उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्टस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्था मधील मोकळ्या जागा येथे होळी , धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साजरे करण्यास आवश्यक झाले आहे असे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सांगितले.
आज पिंपरी चिंचवड चे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनीही आम्हांला आदेश आले असून आयुक्त राजेश पाटील यांनीही स्थायी च्या बैठकीत शहरात हे दोन्ही सण साजरे न करण्याविषयी ची माहिती दिली.
त्यामुळे येणाऱ्या रविवार दि २८ मार्च ला होळी व सोमवार दि २९ मार्च रोजी धुलीवंदन व रंगपंचमी हे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.