वाकड येथे कोरोना लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी- विशाल वाकडकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

वाकड :- दि २४ मार्च २०२१
कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली असून वाकड या परिसराची लोकसंख्या मोठी आहे. सध्या वाकड गावठाणात जे केंद्र सुरु आहे ते या भागाच्या एका टोकाला आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय केंद्रावर गर्दी असल्यामुळे बऱ्याच जणांना लस न घेताच मागे परतावे लागत आहे.
तरी आमची अशी मागणी आहे कि आपण महानगरपालिकेच्या ‘आबाजी भूमकर शाळा’ भुमकर वस्ती येथे अजून एक कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देन्यात आले.
यावेळी विशाल पवार- उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
मयुर जाधव- उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पिंपरी चिंचवड शहर तसेच
प्रतिक साळुंखे – सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या उपस्थितीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले.