जांबुत च्या शुभम माळवे ने सी. ए. पदाला घातली गवसणी…

शिरूर,(रवींद्र खुडे, विभागीय संपादक ) 22 मार्च 2021

शुभम राजकुमार माळवे जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाला असून, त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शुभम चे दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञान मंदिर हायस्कूल आळे, ता. जुन्नर येथे झसली असून, एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण बी. एम. सी. सी. कॉलेज, पुणे येथे झाले आहे. शुभम चे वडील राजकुमार जयराम माळवे हे, जय मल्हार हायस्कुल जांबुत, ता. शिरूर, जी. पुणे येथे लेखनिक या पदावर कार्यरत असून, शुभमची आई माया राजकुमार माळवे या, श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा, ता. जुन्नर, जी. पुणे येथे शिक्षिका आहेत. सी. ए. परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल, डी. सी. एम. सोसायटी पुणे या संस्थेचे सचिव एम. डी. शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपुत, खजिनदार विशाल शेवाळे, ग्रामीण विभागाचे पर्यवेक्षक एस. बी. धायगुडे, जय मल्हार हायस्कुल जांबुत ता. शिरूर चे मुख्याध्यापक आर. एस. कापसे, श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा ता. जुन्नर चे मुख्याध्यापक पी. ई. आंधळे, सर्व शिक्षक, मित्रपरिवार तसेच, जांबुत व रानमळा येथील ग्रामस्थांनी शुभमच्या जिद्द व चिकाटीचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.