पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हृदय तपासणी व अँजिओग्राफी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड दि २१ मार्च
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त्त पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन विद्यमान नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक शंकर काटे, ज्ञानेश्वर काटे, संपत मेटे, मनोहर काटे, विकास काटे, आनंदा काटे, सुरेश काटे, अर्जुन काटे, दत्त्ता काटे, उत्तम धनवटे, बाळासाहेब भुंडे, रमेश भिसे, पांडुरंग काटे, संदीप काटे, बबन काटे, माऊली पुजारी, प्रमोद काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, मीनाताई मोहिते, सागर बिरारी, गौरव नागरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरा सभागृहाचा आवारात दिनाक १९ मार्च रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये गरजू गरीब व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ECG, 2D ECO करण्यात येणार आहे. यात गरजू व गरीब हृदयरोग रुग्णांची मोफत अँजिओग्राफी तपासणी व त्या आधीच्या तपासण्या चाचण्या (उदा .२ डी.इको ) वाय.सी.एम.हॉस्पिटल मधील रुबी एलकेअर संचालित हदयरोग केंद्रात करण्यात येईल. यासाठीची प्राथमिक तपासणी ब्लडप्रेशर , ECG हृदयरोगता डॉक्टरांकडून तपासणी याठिकाणी होणार आहे. यात नाना काटे परिवरातर्फे ज्यांना हृदयरोगता निधान होईल त्याच्यावर मोफत अँजिओग्राफी रुबी एलकेअर येथे उपचार करून देणार आहे अशी माहिती नाना काटे यांनी दिली.