नारायणगाव दि २० (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) – नारायणगाव तालुका जुन्नर येथील गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील शिक्षक संजय पांडुरंग कोकणे वय ४७ यांचे शुक्रवार दि १९ रोजी कंटेनरच्या धडकेत अपघाती निधन झाले .
त्यांच्यामागे वडील ,भाऊ ,पत्नी ,तीन बहिणी ,मुलगा व दोन मुली असा परिवार आहे . काल दि १९ रोजी रात्री १०. १५ वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील हॉटेल श्रीराज समोर संजय कोकणे हे स्कुटी (एम एच १४ एफएस ६५४३ ) वरून घरी जात होते.
यावेळी पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असलेल्या कंटेनर (एम एच ४६ बीबी ४६४१) ची धडक होऊन ते जागीच मृत्यूमुखी पडले.
हप्तेखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे आंदोलन…
रोहित खर्गेविभागीय संपादक पिंपरी चिंचवड दि २१ मार्च महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस…