माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन..

राजाभाऊ गुंजाळ बेल्हे गावचे विद्यमान सरपंच होते

जुन्नर प्रतिनीधी
15/03/2021

जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेते बेल्हे गावचे विद्यमान सरपंच तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे ह्रदय विकाराने सोमवार दि.15 मार्च रोजी निधन झाले.
राजाभाऊ गुंजाळ हे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेते म्हणून सर्वानाच परिचित होते.जुन्नर पंचायत समितीचे सभापती असताना राजाभाऊ गुंजाळ यांनी अनेक समाज उपयोगी निर्णय घेऊन आपल्या कामाची छाप जनमानसावर सोडली.

राजाभाऊ गुंजाळ हे शिवसेना पक्षात जरी होते तरी त्यांचे सर्व पक्षीय मित्र होते.कार्यकर्त्यांशी नेहमी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन राजाभाऊ गुंजाळ यांनी नेहमी कार्यकर्ते जोडत शिवसेना संघटन जुन्नर तालुक्यात वाढवले…
राजाभाऊ गुंजाळ यांच्या निधनाची बातमी समजली आणि प्रचंड धक्का बसला राजाभाऊ गुंजाळ यांच्या निधनामुळे जुन्नर तालुका शिवसेनेने एक अष्टपैलु नेतृत्व गमावले असून ही हाणी कधीच भरून येणारी नाही अशा शब्दांत माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी आपला आवाज शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी आणि राजाभाऊ जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले तसेच राजाभाऊ गुंजाळ हे जेव्हा पंचायत समिती सभापती होते तेव्हा त्यानी चुकीचे काम करणा-या अनेक अधिका-याना वठणीवर आनले होते…एक स्पष्ट बोलणारा आणि जुन्नर तालुका शिवसेना वाघ अशी ओळख असलेला राजाभाऊ आपल्यात नाही हे मन मान्यच करत नाहीहे माझ्या बुचके परिवार आणि पुणे जिल्हा परिषद तसेच जुन्नर तालुक्यातील राजाभाऊ गुंजाळ यांच्यावर प्रेम करणा-या अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुखातुन सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशा शब्दांत पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई बुचके यांनी आपला आवाज शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *