क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिन उत्साहाच्या वातावरणात ओतूर येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये संपन्न…

(ओतूर : प्रतिनिधी दिपक मंडलिक)

जुन्नर तालुक्याच्या पहिल्या महिला माजी आमदार लतानानी श्रीकृष्ण तांबे यांचा कर्तृत्ववान महिला स्त्री म्हणून गौरव
8 मार्च 2021 या जागतिक महिला दिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानने अतिशय उत्साहाच्या वातावरणात महिला दिन साजरा केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीम.निलमताई तांबे होत्या.या प्रसंगी प्रास्ताविक सुशिला डुंबरे यांनी केले.आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये त्यांनी प्रतिष्ठानची ध्येय धोरणे तसेच घेतलेले उपक्रम नमूद केले.त्यानंतर अध्यक्षपदाच्या सूचनेस शुभदा गाढवे यांनी अनुमोदन दिले.


यावेळी दिवंगत वै.सुमंत महाराज नलावडे,वै.विष्णूपंत महाराज ढमाले तसेच ज्ञात व अज्ञात व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.याशिवाय उर्मी संस्था पुणे यांच्यावतीने “कमवा व शिका ” या योजने अंतर्गत शिलाई मशिनचे उद्घाटन लतानानी यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळेस उर्मी संस्थेच्या
वैशाली मँडम व शेंडे मँडम उपस्थित होत्या.महिला दिनाचे औचित्य ठेऊन सावित्रीबाई प्रतिष्ठानच्यावतीने पुजा वाघ व सोनाली वाघ या दोन विद्यार्थीनींना 26,500 रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली.[ 10,000 रु.प्रतिष्ठान तर 16,000 रु.प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्यातून ] याशिवाय उर्मी संस्थेकडून व विकास संस्थेकडुन रु.5000 चे शैक्षणिक साहित्याचे वाटप या मुलींना करण्यात आले.याशिवाय ओतूर येथील चैतन्य अन्नपूर्णा योजनेसाठी रु.5000 ची देणगी सा.फुले प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.याच कार्यक्रमामध्ये जि.प.सदस्य मोहितजी ढमाले, वैभवशेठ तांबे,सीमा तांबे, निलमजी तांबे,सुनिता घोडे, ललिता पारवे, विठ्ठल शितोळे, भाऊसाहेब खाडे ,लतानानी तांबे, शेंडे मँडम, वैशाली मँडम, तसेच उपस्थित सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षक नेते संजय डुंबरे यांचे सत्कार करण्यात आले.याप्रसंगी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक तसेच ग.म.शि.प्र.मंडळाचे शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मोहितजी ढमाले,पुजा वाघ, शेंडे मँडम,अरुणा आरोटे,रोहिणी वाघचौरे,पारवे मँडम,लतानानी याचेवतीने भाऊसाहेब खाडे तर निलमताई तांबे यांचे वतीने वैभवशेठ तांबे यांनी मनोगते व्यक्त केली व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे ईशस्तवन शुभांगी पाडेकर,स्वागतगीत वनिता जाधव, आभार मंगल बारवणकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *