बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ…

बेल्हे (विभागीय संपादक रामदास सांगळे)

येणार येणार असा गाजावाजा होत असताना सोमवार (दि.८) रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्या अनघा घोडके यांच्या हस्ते करोना लसीकरणास प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे (ता.जुन्नर) येथे सुरुवात झाली. यावेळी अनघा घोडके यांनी प्रथम लस टोचून घेऊन सर्वसामान्य लोकांनी लस घेण्यास काहीही हरकत नाही असा संदेश दिला.यावेळी ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील व्यक्ती की ज्यांना सहव्याधी म्हणजे रक्तदाब व शुगर असणाऱ्या व्यक्तिंना
प्रामुख्याने लसीकरण करण्यात येणार असून आठवड्यातील सोमवार,बुधवार व शुक्रवार या तीनच दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेतच फक्त १०० व्यक्तींना लसीकरण करण्यात
येणार असून ही लस नागरिकांसाठी संपूर्णपणे मोफत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हेचे वैद्यकीय अधिकारी एस.बी.थोरात यांनी दिली.याप्रसंगी येथील डाॕ.डी.बी.मते,डाॕ.मनोहर खोमणे,सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके,उपसरपंच निलेश कणसे,दत्तात्रय पळसकर व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *