आपला आवाज चा अंदाज खरा ठरला ” डार्क हॉर्स ” नितीन लांडगे च स्थायी चे सभापती जवळजवळ निश्चित..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि २ मार्च २०२१
राजकारणात काहीही होऊ शकते याचा प्रत्यय आज पिंपरी चिंचवड च्या स्थायी सभापती उमेदवारी अर्ज सादर करताना आला. स्थायी चे माजी सभापती संतोष लोंढे यांचा कार्यकाळ संपल्या नंतर नवीन सभापती कोण यावर खूप चर्चा घडल्या. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक शत्रुघ्न काटे व भाजपचे निष्ठावंत कै. अंकुशराव लांडगे यांचे वारसदार रवी लांडगे यांचे च नाव सर्वचजण आघाडीवर घेत होते. भल्याभल्यांचे अंदाज चुकले. आपला आवाजने २२ फेब्रुवारी रोजीच्या बातमीत ज्यांचे नाव कोण्हीच घेत नव्हते असे हवेलीचे प्रथम आमदार ज्ञानेश्वर लांडगे (माऊली) यांचे आजही भोसरीमध्ये आदराने नाव घेतले जाते यांचे चिरंजीव उच्चशिक्षित वकील असलेले नितीन लांडगे यांचे नाव प्रथम आपला आवाजने ” डार्क हॉर्स ” म्हणून २२ फेब्रुवारीच्या बातमीत पटलावर आणले. तेव्हा सांगितले होते की नितीन लांडगे हे बाजी मारू शकतात. आणि आपला आवाजचा अंदाजच खरा ठरला. स्थायी सभापती पदाचे प्रमुख दावेदार असलेले शत्रुघ्न काटे व भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे रवी लांडगे यांचा पत्ता कट करून खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स असणारे नितीन लांडगे यांनी सूंबडीत कोंबडी या उक्तीप्रमाणे शांतीत क्रांती करून स्थायी सभापती पदाची ची माळ गळ्यात खेचुन आणली. व आपला आवाजच अंदाज खरा ठरला.


इकडे पक्षनेते नामदेव ढाके यांची पत्रकार परिषद सुरु असताना च तिकडे महापौर माई ढोरे यांच्याकडे स्थायी च्या सदस्य पदाचा राजीनामा सुपूर्द केला. पत्रकार कक्षात नगरसेवक रवी लांडगे यांनी भावुक होऊन आपल्यावर पक्षाने अन्याय केला त्यामुळे आपण स्थायी च्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.
खऱ्या अर्थाने भोसरीचे आमदार पै. महेशदादा लांडगे यांनी आपणच राजकीय आखाड्यातील मातब्बर असल्याचे गावकीभावकी च्या राजकारणात दाखवून दिले.
राष्ट्रवादीने प्रवीण भालेकर यांचा स्थायी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला असून आम्हीही सांगलीच्या धर्तीवर चमत्कार घडवू शकतो असे सांगितले असले तरी मागच्या वेळी महापौर पदाच्या निवडीच्यावेळीही अशीच डरकाळी राष्ट्रवादी ने फोडली होती पण प्रत्यक्षात माघार घेण्याची नामुष्की ओढवली होती. तशी वेळ आता येऊ नये म्हणजे झाले. आता नाराज झालेले नगरसेवक शत्रुघ्न काटे बंड करतात की मागील वेळी सारखेच थंड होतात याकडे राजकिय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या निवडीनंतर व राजकीय घडामोडींनंतर खऱ्या अर्थाने आता पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे असे म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *