क्रांतिगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी बाबत उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस | उपेक्षित मातंग समाजाच्या विकासाला मिळणार गती..

  • शासनाने तात्काळ कार्यवाही करावी -अमित गोरखे मा.अध्यक्ष लोकशाहीर आणणा भाऊ साठे विकास महामंडळ.

पिंपरी दिनांक १ मार्च २०२१
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आणि मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य सरकार ने निर्माण केलेल्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी या शासनाने लागू केल्या नव्हत्या .परंतु नुकतेच या विषयावर माननीय उच्च न्यायालयाने लक्ष घालून महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली आहे .त्यामुळे या शिफारशी लागू झाल्यास मातंग समाजाचा विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास लोकशाहीर आणणा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे .
या अभ्यास आयोगाची स्थापना २००५ साली मातंग सामाजाच्या सामाजिक ,आर्थिक व इतर बाबीचा अभ्यास करण्यासाठी केली होती .आयोगाबरोबरच या क्षेत्रात अग्रेसर असणारी टाटा समाजविद्दान संस्थेने ही याबाबत सर्व्हे करून या शिफारशी दिल्या होत्या परंतु त्या फार वर्षांपासून प्रलंबित ठेवल्या होत्या व याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.


अखेर मां. उच्च न्यायालयाची क्रातीविर लहुजी साळवे अभ्यास अयोगाच्या शिफारशी लागु करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनास नोटीस जारी करण्यात आली आहे .क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास अयोगाच्या शिफारशी अमलबजावणी प्रकरणी मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.२५- ०२- २०२१ रोजी याचिकाकर्ते प्रा. संजय शिंदे यांचे वकिल अँड .कानडे अंगद एल. यांना ऐकुन महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवासह सामाजिक न्याय विभागाच्या सचिवास नोटीस काढुन महाराष्ट्र शासन निर्णय दि.३१ /१२/ २०११ परिशिष्ट “अ” प्रमाणे मान्य केलेल्या 82 पैकी 68 शिफारशी लागु करण्या संदर्भात म्हणने सादर करण्यास सांगितले आहे..पुढील सुणावनी एप्रिल मध्ये ठेवण्यात आली आहे. तरी या याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून या शिफारशी बाबत कार्यवाही करावी याबाबत मातंग समाजाचे शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे अमित गोरखे यांनी या वेळी जाहीर केले .