बहुचर्चित व रखडलेला पंतप्रधान आवास योजनेचा लकी ड्रॉ अखेर केंद्रीय मंत्ती प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने मार्गी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि २७ फेब्रुवारी २०२१
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३६६४ सदनिकांचा लकी ड्रॉ आज चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात पत्रकार व मोजके लाभार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार यावेळीं संगणकीय पद्धतीने चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना संगणकीय सरमिसळ पद्धतीने राबविण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन व लकी ड्रॉ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, यांचे शुभहस्ते आमदार महेश लांडगे , महापौर माई ढोरे , उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे , माजी महापौर मंगल कदम , नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते ,

    यावेळी  आमदार महेश लांडगे , पक्षनेते नामदेव ढाके व महापौर माई ढोरे यांनी शहरातील विविध योजनेची माहीती देताना , ह्या घरकुल योजने अतंर्गत मिळणार्या विविध सुविधांची माहीती दिली , तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे केंद्र शासनाच्या पंतप्रधान मंत्री आवास योजनेमध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना १०% रक्कम भरावी लागणार असून सर्व पात्र लाभार्थीची यादी पिंपरी चिचंवड महानगर पालिकेच्या ऑफिशियल  वेबसाईट वर उपल्बध होणार आहे .केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऑनलाईन भाषणात  पंतप्रधान आवास योजनेची माहिती व या प्रकल्पाला शुभेच्छा देताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब लोकांना घरे उपलब्ध करून दिली व महिलांना स्वयंपाकासाठी  खेडोपाडी गॅस  उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. नंतर 8 कोटी 32 लाख रुपयांचे कामाचे  वाकड रत्नदीप कॉलनी ते भिंगारे कॉर्नर  रस्त्याचे भूमी पूजन  , बर्ड व्हॅली लेझर शो चे भूमिपूजन , समांतर पुलाचे भूमिपूजन , पिंपळे सौदागर ते पिंपरी समांतर पुलाचे भूमिपूजन पिंपरी येथे सुसज्ज ग्रंथालय , व विविध कामांचे  ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले.  त्यानंतर  चऱ्होली, बॉऱ्हाडे वाडी व रावेत  येथील  सदनिकांचे  ऑनलाइन लकी  ड्रॉ  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यात चऱ्होली येथील 1442 सदनिकांचे लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले  येथील पहिल्या 5 लाभार्थ्यांची नावे आमदार महेश लांडगे यांनी वाचून दाखवली.  त्यानंतर बॉऱ्हाडेवाडी येथील     1288 घरांची यादी ऑनलाईन लकी ड्रॉ प्रदर्शित करण्यात आली त्यातील  5 लाभार्थींची नावे महापौर माई ढोरे यांनी वाचून दाखवली. त्यानंतर रावेत येथील  ९३४ सदनिकांची सोडत  जावडेकरांच्या हस्ते काढण्यात आले त्यातील पहिल्या  ५ भाग्यवंतांची नावे आयुक्त राजेश पाटील व स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी वाचून दाखवली . यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना sms द्वारे माहिती दिली जाईल. व यात लाभार्थी ठरलेल्याना सदनिका कोणत्या इमारतीत कोणत्या मजल्यावर सदनिका  मिळणार याचेही लकी ड्रॉ  मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला त्यात दिव्यांगांना प्राधान्य देण्यात आले. व चऱ्होली चा  ड्रॉ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते काढण्यात आला . त्यानंतर बोऱ्हाडेवाडी येथील लकी ड्रॉ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.  

रावेत येथील लकी ड्रॉ चे लोकेशन उपमहापौर केशव घोळवे व पक्षनेते नावदेव ढाके यांच्या हस्ते काढण्यात आले. ऑनलाइन पद्धतीचे सरमिसळ पद्धतीने लाभार्थ्यांच्या या लकी ड्रॉ ची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे यांनी दिली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने लकी ड्रॉ होता व महानगरपालिकेने नागरिकांना कळवूनही खूप नागरिक बाहेर उपस्थित होते. पालिकेच्या संकेतस्थळावर थेट प्रेक्षपण होते पण त्यावर आवाज वेवस्थित नसल्याची तक्रार व नाराजी अनेक नागरिकांनी वेक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त आण्णा बोदडे तर आभार उपमहापौर केशव घोळवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *